बनावट कागदपत्रे व सह्या करून स्वामीलचा परवाना मंजूर करून शासनाची फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील अंबिका स्वामीलचे मुळ मालक १९८३ मध्ये मयत असतांना त्यांच्या नावे खोटे कागदपत्रे आणि बनावट सह्या करून स्वामीलचा परवाना नुतनीकरण सन-२०२० पर्यंत करण्यात आल्याचे वनविभागाच्या चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी मयतचा मुलावर याप्रकरणी गुरूवारी १८ मे रोजी दुपारी ३ वाजता शहर पोलीस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगरात अंबिका स्वामील हे मुळ मालक रावजी अर्जून पटेल यांच्या नावे होते. दरम्यान, रावजी पटेल यांचे सन-१९८३ मध्येच निधन झाले होते. असे असतांना रावजी पटेल यांचा मुलगा रसिक रावजी पटेल याने सन १९८३ पासून ते २०२० पर्यंत अंबिका स्वामीलचा दरवर्षीचा परवाना नुतनीकरणासाठी बनावट कागदपत्रे व सह्यांचा वापर करून वनविभाग जळगाव यांना सादर केल्यानंतर परवाना नुतनीकरण झालेला आहे. शासनाची फसवणूक होत असल्याने संदर्भात एकाने जळगाव वनविभागाच्या कार्यालयात तक्रार अर्ज केला होता. यात मुळ मालक रावजी अर्जून पटेल यांचे निधन सन-१९८३ मध्ये निधन झाल्याचे नमूद केले होते. शिवाय आतापर्यंत केलेला स्वामीलचा घेतलेला परवाना हा बनावट कागदपत्रे व खोट्या सह्यांचा वापर करण्यात आल्याचे नमुद केले होते. वनविभागाने तक्रारीची दखल घेत कर्मचाऱ्यांमार्फत चौकशी केली असता महापालिकेने दिलेल्या मृत्यू दाखल्यावरून मुळ मालक रावजी पटेल यांचे १९८३ मध्येच निधन झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून वनविभाग परिक्षेत्र अधिकारी नितीन बोरकर यांनी शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रसिक रावजी पटेल याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content