Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक; सुप्रिम कंपनीच्या २७ जणांविरोधात गुन्हा

fraud

जळगाव प्रतिनिधी । खोटे व बनावट दस्ताऐवज तयार करुन शासनाने ठरवून कंपनी कायद्याचे उल्लंघन करत गुणवत्ता अधिकाऱ्‍याचीच फसवणूक केल्याप्रकरणी सुप्रीम कंपनीचे चेअरमन, संचालक, कार्यकारी संचालक, सी.ए. व अधिकारी अशा एकूण २७ जणांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

किमान वेतन, शासनाकडे जमा करावयाची प्रॉव्हीडंट फंडाची रक्कम, ग्रॅज्युटी, बोनस व निवृत्ती वेतन यात खोटे व बनावट कागदपत्रे बनवून ते खरे असल्याचे भासविल्याने तक्रार प्रमोद बालकिसन मंत्री (49, रा.शिवराणा नगर, जळगाव) यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार त्यावरुन सुप्रीम इंडस्ट्रीजचे चेअरमन बी.एल.तापडिया, का. संचालक एम.पी.तापडिया, वरिष्ठ उपाध्यक्ष जे.एम.तोतला, संचालक एस.जे.तापडिया, व्ही.के.तापडिया, बी.व्ही.भार्गव, ई.बी.देसाई, एच.एस.पारेख, एन.एस.खंडेलवाल, एस.आर.तापडिया, वाय.पी.त्रिवेदी यांच्यासह महाव्यवस्थापक जी.के. सक्सेना, संजय यशवंत प्रभुदेसाई, व. महाव्यवस्थापक शकील अहमद शेख, व्यवस्थापक ए.एस.मुळे, सतीश भगीरथ सोमानी, सुरेश मंत्री, अनिल काशिनाथ काबरा, राजू कोठारी, अतुल लठ्ठा, मनिष पाठक, महेश एम.पाटील, अशोक मोगरे, जितेंद्र बडगुजर, जे.एच.चौधरी व एच.एन.जैन आदी अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version