Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बजरंग बोगद्याजवळ मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  प्रतिनिधी । शहरातील बजरंग बोगद्याजवळ मालवाहू ॲपे वाहनाची दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून दुचाकीचे नुकसान केल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मालवाहू वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जिल्हापेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप भास्कर मिस्तरी (वय-४५) रा. उंटावद ता. यावल जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. ते फर्निचरचे काम करून उदरनिर्वाह करतात. २१ फेब्रुवारी रोजी दुचाकी (एमएच १९ डीडब्ल्यू ०७६१) ने जळगाव शहरात कामानिमित्त आले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास ते शहरातील नवीन बजरंग बोगद्याजवळील केवल हॉस्पिटलसमोरून दुचाकीने जात होते. त्यावेळी त्यांच्या पुढे मालवाहू ॲपे (एमएच १९ सीवाय १८६३) वाहन जात होते. त्यावेळी मालवाहू हत्ती रस्त्यावर थांबून मागे घेत असतांना मागे असलेली दुचाकीला धडक दिली. यात प्रदीप मिस्तरी हे जखमी झाले. अपघात घडल्यानंतर मालवाहू ॲपे वाहनावरील चालक हा वाहन घेवून पसार झाला होता. प्रदीप मिस्तरी यांनी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मालवाहू वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक युनूस तडवी करीत आहे.

Exit mobile version