बंद घर फोडून चोरट्यांनी रोकड, टीव्हीसह घरासमोर उभी दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवकॉलनीत बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील रोकड, टीव्हीसह घरासमोर उभी दुचाकी चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवार, ६ मे रोजी रात्री  सव्वा नऊ वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील नंदनवन कॉलनीत डॉ सुशील गुर्जर हे राहतात. त्यांचे शिवकॉलनीत घर असून याठिकाणी त्यांचे मेव्हणे राहतात. मेव्हणे हे काही कामानिमित्ताने बाहेर गेले असल्याने २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपासून घर बंद होते. गुर्जर यांचे मेव्हणे हे बाहेरगावारुन शनिवार,  ६ मे रोजी दुपारी साडेचार वाजता घरी परतले असता, त्यांना घरात सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला, घराबाहेर उभी दुचाकी दिसून आली नाही, तसेच घरात पाहणी केली असता, ११ हजारांची रोकड, तसेच टीव्ही सुध्दा दिसून आला नाही. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन चोरी केल्याची खात्री झाल्यावर डॉ सुशील गुर्जर यांनी शनिवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील चौधरी हे करीत आहेत.

Protected Content