Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एसटी महमंडळात म्याकॅनिक म्ह्णून नोकरीला असल्याच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमाराास रायसोनी नगरातील निसर्गसुंदर अपार्टमेंटमध्ये घडली. याठिकाणाहून चोरट्यांनी २ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केला असून याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रायसोनी नगरातील निसर्गसुंदर अपार्टमेंटमध्ये हेमंत अनंतराव पाटील हे वास्तव्यास असून ते एस. टी. महामंडळात मॅकनिक म्हणून नोकरीस आहे. पाटील यांचे महाबळ परिसरात कटलरीचे दुकान असल्याने ते पत्नीसोबत दुकानावर गेले होते. दुपारी जेवणासाठी ते घरी आले असता, त्यांना घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप दिसले नाही तर दरवाजाला केवळ कडीकोयंडा दिसून आला. त्यांनी घरात जावून बघितले असता, घरातील गोदरेजचे कपाट उघडे होते तर त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी तात्काळ रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. चोरट्यांनी हेमंत पाटील यांच्या घरातून सोन्याची मंगलपोत, कानातले, चैन, अंगठी, सोन्याचा कॉईन यासह रोख रक्कम असा एकूण २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लांबविला.

Exit mobile version