Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बंद घरातून सोन्या-चांदीचे दागिन्यांसह रोकडची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील दांडेकर नगरातील कार्तिक पार्क येथे बंद घराचे दरवाजा तोडून आत प्रवेश करत सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोकड असा एकूण १ लाख २०हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या संदर्भात शुक्रवार २१ एप्रिल रोजी रात्री १० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुमेध पंडित माधव नेतकर (वय-५२, रा. कार्तिक पार्क, दांडेकर नगर, जळगाव) हे आपले परिवारासह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करीत असतात.  शुक्रवार २१ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी दीड वाजे दरम्यान त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण १ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दुपारी दीड वाजता नेतकर हे घरी आले, त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. आत जाऊन पाहणी केली तर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री १० वाजता अज्ञात चोरट्यांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.

Exit mobile version