Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बंद घरातून लाखोंचा मुद्देमाल लांबविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच संशयितांना अटक !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहुर येथील बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोकड असा लाखो रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबविणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून या गुन्ह्यातील पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडून चोरीपैकी १६ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील पहुर येथे एकाचे बंद घर फोडून सुमारे लाखो रूपये किंमतीचा सोन्याचे दागिने व रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या संदर्भात पहूर पोलीस ठाण्यात २९ ऑगस्ट २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पहूर येथे धाडसी घरफोडी करणारे संशयित आरोपी हे जळगाव शहरातील असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत सय्यद सरजील सय्यद हरून (वय-२७, रा. मास्टर कॉलनी जळगाव), अनिल रमेश चौधरी (वय-४०, रा. अयोध्या नगर जळगाव), सय्यद अराफत सय्यद फारूक (वय-३३, रा. तांबापूरा), सय्यद अमीन उर्फ बुलेट सय्यद फारुख (रा. तांबापुरा) आणि भावना जवाहरलाल जैन (लोढा) अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या रकमेपैकी १६ लाख ९० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पाचही जणांना पुढील कारवाईसाठी पहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अनिल जाधव, रवी नरवाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय हिवरकर, विजयसिंह पाटील, राजेश मेढे, सुधाकर अंभोरे, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, अक्रम शेख, पोलीस नाईक संतोष मायकल, नितीन बाविस्कर, नंदलाल पाटील, विजय पाटील, भगवान पाटील, श्रीकृष्ण देशमुख, परेश महाजन, विनोद पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल अभिलाषा मनोरे, वैशाली सोनवणे, अश्विनी सावकारे आणि रूपाली खरे अशा पथकाने कारवाई केली. तर सपोनी वसंत कांबळे, पोउनि सचिन डोंगरे, पोहेकॉ जयंत चौधरी, पोना विनायक पाटील, पोना किशोर मोरे, पोना सचिन चौधरी यांनी तांत्रिक सहकार्य केले.

Exit mobile version