Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बंद घरातून दीड लाखांचा ऐवज लांबविला

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रुपये असा एकूण १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची उघडकीला आले आहे. या संदर्भात पहुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहूर पोलिसांनी दिलेले माहिती अशी की, जोगेश्वर अनिल अग्रवाल (वय-३५, रा. शेंदुर्णी ता. जामनेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या नातेवाईकांकडे लग्न असल्यामुळे घराला कुलूप लावून ते गावाला गेले होते. दरम्यान घर बंद असल्याने अज्ञात चोरट्यांनी फायदा घेत बंद घर फोडून घराचे घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून गेल्याचे घटना उघडकीला आला आहे. लग्न होऊन जोगेश्वर अग्रवाल हे घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. त्यांनी तातडीने पहुर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गरजे करीत आहे.

Exit mobile version