Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बंदोबस्ताला दांडी मारणारे तिघे पोलीस कर्मचारी निलंबित

जळगाव प्रतिनिधी । मालेगाव येथे बंदोबस्ताची ड्युटी लागली असतांनाही याला दांडी मारणार्‍या तिघा पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी निलंबित केले आहे.

याबाबत माहिती अशी की, पोलिस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) यांनी मालेगाव येथे विविध ठिकाणी बंदोबस्त लावला होता. त्यासाठी जळगाव जिल्ह्यातून ११० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी पाठवले आहेत. त्यापैकी सहा पोलिस कर्मचारी हे त्यांना नेमून दिलेल्या कर्तव्याच्या ठिकाणी गैरहजर असल्याबाबत नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांनी जळगाव पोलिस अधीक्षकांना अहवाल पाठवला होता. निलंबित करण्यात आलेल्या तिघांसह जळगाव पोलिस मुख्यालयातील सोनजी सुभाष कोळी, शनिपेठ पोलिस ठाण्याचे राहुल पाटील व राहुल घेटे हे कर्तव्यावर गैरहजर असल्याचे कळवले होते. या प्रकरणी पोलिस अधीक्षक उगले यांनी अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्याकडे चौकशी दिली होती. चौकशीअंती तिघही पोलिस दोषी आढळून आले. त्यानूसार पोलिस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version