Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बंडखोरांनी राजीनामा देऊन जनतेतून निवडून यावे — विशाल त्रिपाठी

जळगाव, प्रतिनिधी  । भाजपा फुटीर नगरसेवक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये स्वतःला पांडव व भाजपा निष्ठावंतांना कौरव म्हटले आहे. याचा समाचार घेत  भाजपचे जिल्हासरचिटणीस तथा नगसेवक विशाल त्रिपाठी यांनी पांडवांमधील नैतिकतेचा एक गुण तरी त्यांच्यात आहेत का ? असा प्रश्न उपस्थित करत बंडखोरांनी राजीनामा देऊनपुन्हा निवडून यावे असा उपरोधिक सल्ला प्रसिद्धी पत्राद्वारे दिला आहे.

 

भाजपचे जिल्हासरचिटणीस विशाल त्रिपाठी यांनी  प्रसिद्ध पत्रात म्हटले आहे की,   बंडखोरांमध्ये नैतिकता असती तर नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन पोट निवडणुकीत निवडून आले असते. जनतेने भाजपाच्या चिन्हावर आपणांस निवडून दिले. हे जळगावच्या जनतेला माहिती आहे की बंडखोरांचे पक्षांतराचा हेतू काय आहे, जनतेला मूर्ख समजू नये. इतकीच जर शहराच्या विकासाची काळजी असेल तर आपण ज्या पक्षात गेले त्या पक्षाची राज्यात सत्ता आहे व आता महानगरपालीकेत ही आहे. आपली राजकीय पत सिध्द करून १०० कोटी निधी आपण आणून आपली राजकीय पत सिध्द करावी. असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे. आपण आता भाजपाचे नगरसेवक नाही. त्यामुले आम्ही काय करावे हे फुकटचे सल्ले आम्हाला देऊ नये. जी बंडखोरी आपण केली ती चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर जनतेचा विश्वस घात करून केली त्यामुळे भाजपा त्यावर कायदेशीर लढा देईल. न्यायालय योग्य तो निर्णय घेऊन कारवाई  होणारच याबद्दल कोणतीही शंका नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version