Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बँकेतून बोलत असल्याचे सांगून तरूणाला लावला ६० हजाराचा चुना

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील निम गावात राहणाऱ्या तरूणाला बँकेतून बोलत असल्याचे सांगून ओटीपी विचारून परस्पर बँक खात्यातून ६० हजार रूपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी बुधवार २२ मार्च रोजी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनिल शिवाजी पाटील (वय-३१) रा. निम ता.अमळनेर हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतो. १ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता सुनिल पाटील हा तरूण घरी असतांना त्यांला एका अनोखळी नंबरवरून कॉल आला. आपण बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक विचारून घेतला. अज्ञात व्यक्तीने ओटीपीच्या मदतीने तरूणाच्या बँक खात्यातून ६० हजार रूपये परस्पर काढून घेतले. दरम्यान, हा प्रकार त्यांना उशीरा समजल्याने त्यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारवड पोलीस ठाण्यात बुधवार २२ मार्च रोजी दुपारी ४ वाजता फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version