Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बँकांनी खातेदारांच्या विविध अडचणी सोडवाव्यात

जळगाव, प्रतिनिधी । सध्या युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा या अनुषंगाने एकीकडे शासन विविध रोजगार कर्ज योजना उपलब्ध करत असून दुसरीकडे बँक युवकांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत यासह इतर असुविधांबाबत युवासेनेतर्फे बँक व्यवस्थापकांची भेट घेऊन याबाबत अवगत करून देत यात सुधारणा करण्याची मागणी करण्यात

बँक खातेधारकांचे महिन्याला एसएमएस चार्जेस कापत आहे. मात्र प्रत्यक्षात खातेदारांना ती सेवा मिळत नसून बँकेला याबाबत विचारले असता नेहमीच सर्वर अडचण सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा आशयाच्या विविध तक्रारी युवासेनाकडे येत आहे म्हणून आज युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस राहुल पोतदार व युवासेना टिम ने आदर्श नगर मधील आयडीबीआय बँकेला भेट दिली व बँक व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली.

युवकांना रोजगार करण्यासाठी कर्ज हवे असल्यास बँके कडून टाळाटाळ न करता योग्यतेनुसार आपण कर्ज द्यावे, त्यातूनच युवा उदयोजक पिढी घडली जाईल म्हणून युवासेना विविध बँकेना या संदर्भात भेट देणार आहे. आज आयडीबीआय बँकेला भेट देऊन खातेदारांना अशा प्रकारच्या अडचणी यापुढे येऊ नये यावर उपाययोजना करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हा सरचिटणीस राहुल पोतदार, क्षेत्र प्रमुख मिलिंद शेटे, महानगर प्रमुख विशाल वाणी, युवासैनिक गिरीष सपकाळे, रोहित मोरे उपस्थित होते.

Exit mobile version