Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फ्लिपकार्ट पार्सलची बॅगेची चोरी करणारे दोघे अटकेत; एक संशयित अल्पवयीन

जळगाव प्रतिनिधी । फ्लिपकार्टचे पार्सलची बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरूवारी दुपारी दृष्टी हॉस्पिटलसमोर घडली होती. या गुन्ह्यातील संशयित दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक अल्पवयीन आहे. दोघांविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, संजय सोपान पाटील (वय-३०) रा. ओम शांतीनगर, पिंप्राळा जळगाव हा तरूण गेल्या तीन ते चार वर्षांपासून फ्लिपकार्टचे पार्सल डिलेव्हरीचे काम करतो. काल २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता फिल्पकार्टचे पार्सल बॅगमध्ये वस्तू डिलेव्हरीसाठी बाहेर पडला. दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील रामा बिअर बार जवळील दृष्टी हॉस्पिटलमध्ये पार्सल देण्यासाठी आले. त्यांच्या बॅगमध्ये पार्सलचा सामान जास्त असल्याने त्यांनी बॅग दुचाकीवर ठेवून पार्सल देण्यासाठी गेले. दोन मिनीटात पार्सल देवून खाली आले असता त्यांच्या दुचाकीवरून आज्ञात चोरट्यांनी पार्सलची बॅग लंपास केली. बॅगेत विविध पार्सलचे एकुण ४२ हजार २०३ रूपये किंमतीचे सामान होते. संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील सपोनि अशोक महाजन, संजय पवार, रमेश जाधव, पो.कॉ. परेश महाजन, पंकज शिंदे हरीष परदेशी यांनी रिंगरोडवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर संशयित आरोपी कुणाल शिवदास पाटील (वय-१९, रा. हरीविठ्ठल नगर) आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. तर त्यांच्या ताब्यातील ऑनलाईन फ्लिपकार्ट कंपनीचा सामान आणि गुन्ह्यातील दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Exit mobile version