Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फोर्ब्सच्या जगातील श्रीमंतांच्या यादीत सात भारतीय अमेरिकन

 

लंडन ; वृत्तसंस्था / फोर्ब्सनं जगभरातील अतिश्रीमंत अमेरिकन नागरिकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत सात भारतीय अमेरिकन नागरिकांना स्थान देण्यात आलं आहे. सायबर सिक्युरिटी फर्म झेडस्केलरचे जय चौधरी हे ६१ व्या स्थानावर आहेत.

सिम्फनी टेक्नॉलॉजी ग्रुपचे संस्थापक रमेश वाधवानी हे ३.४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह २३८ व्या स्थानावर आहेत.
ऑनलाइन विक्री करणारी कंपनी वेयफेअरचे संस्थापक नीरज शाह यांना फोर्ब्सच्या यादीत २९९ वं स्थान आहे. त्यांच्याकडे २.८ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. सिलिकॉन व्हॅली व्हेंचर कॅपिटल फर्म खोसला व्हेंचर्सचे संस्थापक विनोद खोसला हे २.४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ३५३ व्या स्थानावर आहेत. शेरपालो व्हेंचर्सचे मॅनिजिंग पार्टनर कवितर्क राम श्रीराम यांना या यादीत ३५९ वं स्थान आहे. त्यांच्याकडे २.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

राकेश गंगवा यांना ३५९ वं स्थान असून त्यांच्याकडे २.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. वर्कडे चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भुसरी यांनादेखील ३५९ वं स्थान असून त्यांच्याकडेही २.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. ४०० जणांच्या या यादीत सलग तिसऱ्या वर्षीही अॅमेझॉनच्या जेफ बेझोस यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे १७९ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. १११ अब्ज डॉलर्स संपत्तीसह बिल गेट्स यांना फोर्ब्सच्या यादीत दुसरं स्थान देण्यात आलं आहे.

Exit mobile version