Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फोटो व्हायरल करून अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा हुडको परिसरातील एका भागात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबतचे फोटो काढून सोशल मीडियात व्हायरल करून बदनामी करत लैंगिक छळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २१ मे रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास याच परिसरात राहणारा तुषार प्रमोद वाघ हा पीडित अल्पवयीन मुलीला भेटला व तू मला भेटली नाही तर मी आत्महत्या करून घेईल अशी धमकी दिली होती. त्यामुळे पीडित मुलगी घाबरून गेल्यानंतर तरुणाला भेटण्यासाठी गेली. त्याने तिच्यासोबतचे फोटो काढून ते फोटो सोशल मीडियात प्रसारित केले. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीने रविवारी ४ जून रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तिने दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी तुषार वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा  पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.

Exit mobile version