फैजपूर येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त कार्यकारणीची फेर निवड

फैजपूर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |येथील श्रीराम मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नूतन कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य यांची निवड करण्यात आली.

 

श्रीराम मंदिरात आयोजित बैठकीत प्रभू श्रीराम यांची प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर मागील वर्षी समिती पदाधिकारी यांची फेर निवड सर्वानुमते करण्यात आली. नूतन कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य यांनी प्रभू श्रीराम सार्वजनिक जन्मोत्सव शोभा यात्रा व विविध कार्यक्रम संदर्भात नियोजन करण्यात आला. यावेळी अध्यक्ष नीरज झोपे, उपाध्यक्ष विनोद कोल्हे, खजिनदार रितेश चौधरी, कुणाल कोल्हे, सचिव अमोल जावळे, सदस्य हेमंत भंगाळे यांची निवड करण्यात आली.

 

Protected Content