Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर येथे भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

faijpur band 4

फैजपूर, प्रतिनिधी | राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी विरोधात विरोधी पक्षांच्या वतीने पुकारलेल्या भारत बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून भारत बंदमध्ये सहभाग घेतला.

 

दरम्यान शाळा, रुग्णालये, औषध दुकाने, बँका इ. अत्यावश्यक सेवा वगळता शहर कडकडीत बंदमुळे इतर व्यवहार ठप्प झाले आहेत. बंद शांततेत पाळण्यात आल्याने कोणताही अनसुचित प्रकार घडला नाही. शहरातील सुभाष चौक, कै.बळीराम वाघुळदे कॉम्प्लेक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बाजार पेठ, सरदार वल्लभभाई पटेल कॉम्प्लेक्स तसेच मुख्य शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून भारत बंद मध्ये सहभाग घेतला.

केंद्र सरकारने सीएए आणि एनआरसी हा कायदा घटनेविरूध्द लागू केला आहे. या कायद्यामुळे मुस्लिम समाजच नव्हेतर हिंदु समाजातील मोठा घटक व बहुजन समाज बाधीत होणार आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने शांततेत बंद पाळण्याचे आवाहन सर्व पक्षीयांच्या वतीने करण्यात आले होते. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, फैजपूर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त ठेवून आहे.

Exit mobile version