Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम

फैजपूर प्रतिनिधी । फैजपूर नगरपरिषद  व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने  8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष महानंदा रविंद्र होले, महिला बालकल्याण सभापती सुनंदा कुंभार, दत्त ठिबक संचालिका कविता पवार यांनी आपल्या मनोगतात महिला उद्योजक बाबत मार्गदर्शन केले. माजी नगराध्यक्ष आशालता चौधरी, शहर प्रकल्प अधिकारी प्रवीण सपकाळे, माविय क्षेत्रीय समन्वयक आशीष मोरे व फैजपूर शहरातील महिला बचत गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्व यशस्वी महिलांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या सरोदे प्रास्ताविक विद्या चौधरी यांनी केले तर कार्यक्रम आभार ज्योती सोनोवणे यांनी मानले, कार्यक्रम करिता लिखित सोनोवणे यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version