Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर येथे खंडोबाला कोरोना मुक्तीचे साकडे

 

फैजपूर, प्रतिनिधी  । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडोबा यात्रामहोत्सवानिमित्ताने महाभिषेक करून विश्वशांतीसाठी प्रार्थना करून  कोरोना मुक्तीचे साकडे घालण्यात आले.

खंडोबा यात्रामहोत्सवा चे अनुषंगाने कोरोना प्रतिबंधनात्मक उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊन बंद ला प्रतिसाद देत गादीपती महामंडलेश्वर 1008 श्री पुरुषोमदासजी महाराज व पुजारी राममनोहर दासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना नियमांचे पालन करीत मोजक्या भाविकांची उपस्थितीत कोरोना महामारी  निवारणार्थ विशेष महापूजा अभिषेक  करून संपूर्ण विश्वशांती साठी प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी  नरेंद्र नारखेडे, प्रा. राजेंद्र राजपूत,  कमलाकर भंगाळे यांनी सपत्नीक तसेच  धनंजय शिरीष चौधरी यांचे हस्ते पूजा संपन्न झाली. यावेळी खंडोबाची महाआरती करून इडा पीडा टळो व कोरोना महामारी लवकर जाओचा सामूहिक संकल्प सोडण्यात आला.  याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, माजी उपनगराध्यक्ष प्रा. जी. पी. पाटील, योगेश चौधरी, सुशील जयस्वाल, संजय सराफ, चंद्रकांत भिरुड, नरेंद्र चौधरी, जयश्री चौधरी, पंडित राणे , धनराज नारखेडे  सुनंदा नारखेडे, रत्ना चौधरी, चोलदास पाटील, सुरेश कोळंबे, नंदू जोशी,  हिमांशू जोशी, पवनदासजी,आदी भाविक उपस्थित होते.

Exit mobile version