Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर येथील निघालेल्या मुकमोर्चाला प्रतिसाद

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील फैजपूर येथे देशभरात हिंदूवर होत असलेल्या अत्याचार विरोधात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या वतीने आज  मूक मोर्चा काढयात आला. या मुकमोर्चाला नागरीकांकडून प्रतिसाद मिळाला.

 

मुकमोर्चा शहरातील श्रीराम मंदिर येथून खान्देशरत्न शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर पेहेडवाडा – सरफगल्ली – मोठा हनुमान मंदिर – सुभाषचंद्र बोस चौक –  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग – हुतात्मा बापू वाणी चौक –  बसस्थानकमार्गे नगरपालिका – प्रांताधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.

 

यावेळी प्रांताधिकारी यांच्या वतीने उपसहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन लोखंडे, एमआयशेख यांनी शास्त्री भक्ती किशोरदासजी, शास्त्री अनंतप्रकाश, पुजारी राममनोहर दासजी, कन्हैया दासजी महाराज, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री योगेश भंगाळे, बजरंग दल जिल्हा संयोजक विक्की भिडे, तालुका संयोजक लोकेश कोल्हे, नरेंद्र नारखेडे, अनिरुद्ध सरोद, नितीन राणे यांच्याकडून निवेदन स्विकारले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात वाढलेला हिंचाचार आपल्या देशात हिंदू समाज सध्या दहशतीच्या सावटाखाली आहे. लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद सारखे अनेक जिहाद हिंदू समाजावर आक्रमण करीत आहेत. याशिवाय हिंदू मंदिरांची नासधूस करणे, देवी-देवतांवर असभ्य भाषेत टीका-टिपणी करणे, हिंदू समाज बांधवांना जीवे मारण्याच्या खुले आम धमक्या देणे हे प्रमाण वाढत चालले आहे. हा सर्व प्रकार थांबला पाहीजे मुक मोर्चाच्या शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले.

 

याप्रसंगी भरत महाजन, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, सरचिटणीस संजय सराफ, जितेंद्र भारंबे, नरेंद्र  चौधरी, जयश्री चौधरी, दिपाली झोपे, माजी नगरसेवक संजय रल, प्रा जी के महाजन, दीपक पाटील, दीपक कापडे, हर्षल महाजन, युवराज किरंगे, निरज झोपे, रितेश चौधरी, किरण चौधरी, संदीप भारंबे, राजेश महाजन, दीपक होले, भाजपाचे ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष पिंटू तेली, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष वैभव वकारे, रामा होले, अक्षय परदेशी, जितेंद्र वर्मा, चंद्रकांत भिरुड, मनोज चौधरी, ईश्वर रल, विनोद परदेशी, गुड्डू हिरे, यासह हिंदूवादी संघटनांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version