Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात ऑनलाईन अध्ययनातून ज्ञानदान

फैजपूर प्रतिनिधी । येथील धनाजी नाना महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापकाकडून लॉकडाऊनच्या कालावधीत ऑनलाई अध्ययन हा उपक्रम यशस्वीपणे राबवत आहे.

येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक प्रा. शिवाजी मगर यांनी लॉकडाऊन कालावधीचा यथायोग्य वापर करून टीवायबीएस्सीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम सुरू केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात थैमान घालत असताना भारतातही या विषाणूने भारतातही हळूहळू पाय पसरायला सुरुवात केली आहे. या विषाणू प्रदूर्भावाची साखळी खंडित करण्यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने लॉकडाउन सक्तीचे करण्यात आले आहे. या कालावधीचा अध्ययन अध्यापनासाठी उपयोग करता यावा, या उद्देशाने ऑनलाईन अध्ययन अध्यापनाची युक्ती अतिशय स्तुत्य आहे.

प्रा. शिवाजी मगर स्वतः अभ्यासक्रमातील वेगवेगळे टॉपिक पीपीटी सादरीकरणाने सोप्या पद्धतीने शिकवीत आहेत. यासोबत विविध विद्यापीठातील नामांकित विषय तज्ञांना या ऑनलाइन लेक्चरसाठी आमंत्रित करणार आहेत. ३ एप्रिल रोजी कोल्हापूरातील राजाराम कॉलेजच्या वनस्पती विभागाचे प्रा. डॉ. सुनील सांगळे प्लॉन्ट ब्रेडींग व १४ एप्रिल रोजी प्रा.डॉ.राजेंद्र राजपूत, इंग्रजी विभाग, धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर याचे लिखाण कौशल्ये यावर मार्गदर्शन तृतीय वर्ष विज्ञान विषयाच्या विद्यार्थाना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबद्दल तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरीषदादा चौधरी, सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर. चौधरी, उपप्राचार्य प्रा.डॉ. डी. ए. कुमावत, सर्व प्राध्यापकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Exit mobile version