फैजपूरात सात दिवस ‘जनता कर्फ्यू’: नागरिकांसह सर्वपक्षीय निर्णय

फैजपूर प्रतिनिधी । शहरात कोरोनाबाधितांचा आकडा ५८ वर पोहचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी शहरात १४ ते २० जूलै दरम्यान ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याचा निर्णय नगरपालिका सभागृहात नागरीकांसह सर्वपक्षिय नेत्यांनी घेतला आहे.

फैजपूर नगरपालिका सभागृहाच्या बैठकीस नगरसेवक, पत्रकार, संघटना, लोकप्रतिनिधी सर्वपक्षीय पदाधिकारी वाढत्या कोरोनाच्या वाढत्या महामारीच्या आलेल्या संकटाला कसे थांबवता येईल? यावर विचारविनिमय करण्यासाठी सर्वपक्षीय व संघटनांची बैठक घेऊन नियोजन करण्यात आले. शहरात कोरोनाने कहर केला आहे. एकमेकाच्या संपर्कातून हा रोग वाढतो आहे. हे टाळायचे असेल तर अशा या बिकट संकटात एकमेकाच्या संपर्कात येऊ नये.फिजिकल डिस्टन्सिंग चे नियम पाळावे. आपला परिवार व आपल्या शहराचे आरोग्य रक्षण आपणच करू शकतो. आपण सर्व नागरिक मिळून जनता कर्फ्यू लावून शहर बंद करूनच सुरक्षित राहू शकतो.त्यासाठी आपण सर्वांनी मिळून महसूलप्रशासन, पोलीस प्रशासन ,नगरपालिकाप्रशासन यांच्या सहकार्याने नियोजन करून जनता कर्फ्यू पाळण्याची गरज आहे,यावर सर्वांचे एकमत झाले.

१४ ते २० असे सात दिवस शहरात कडकडीत बंद ठेवण्यात येईल. बंदमध्ये फक्त दवाखाने, मेडिकल, दुध व्यवसाय जनता कर्फ्यू काळात फक्त सुरू राहतील. बाकी सर्व दुकाने, किराणा, भाजीपाला, मोबाईल दुकाने व इतर सर्व दुकाने व्यापारी प्रतिष्ठाने सात दिवस संपूर्ण बंद राहतील. जनता कर्फ्युचे निवेदन प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक वानखेडे यांना देण्यात आले.

यावेळी महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज,फैजपूर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, भाजप गटनेते मिलिंद वाघुळदे, राष्ट्रवादी गटनेते शेख कुर्बान, जेष्ठ नगरसेवक हेमराज चौधरी, नगरसेवक कलीम मण्यार, भाजप शहराध्यक्ष अनंत नेहते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अन्वर खाटिक, देवेंद्र बेंडाळे, शेख इरफान, रघुनाथ कुंभार, केतन किरंगे, देवेंद्र साळी, रईस मोमीन आदी उपस्थित होते.

Protected Content