Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूरात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करा : माजी नगराध्यक्ष पिंटू राणे यांची मागणी

 

यावल,  प्रतिनिधी  । चाळीस हजार लोकवस्तीच्या फैजपुर शहरातील नागरीकांना कोविडशिल्ड लसीकरणासाठी न्हावी ग्रामीण रुग्णालयावर अवलंबुन रहावे लागत असून लसीकरण फैजपूर येथे सुरु करण्यात यावे अशी मागणी फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पिंटू राणे यांनी केली. ते काल खासदार रक्षाताई खडसे यांनी आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.

बैठकीला जळगावचे आमदार सुरेश भोळे , जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा  रंजना पाटील , यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी , जिल्हा परिषदच्या सदस्थ सविता भालेराव , तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार , गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील , प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी मनिषा महाजन,  यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल येथे कोवीड सेन्टर उभारणी व ग्रामीण भागातील कोरोना बाधीतांची वाढती संख्या या विषयांवर तात्काळ तोडगा काढण्यासंदर्भात सविस्तर चर्चा होवुन  निर्णय घेण्यात आले. 

माजी नगराध्यक्ष पिंटू राणे यांनी पुढे सांगितले की,   फैजपुर शहर हे तालुक्यातील चाळीस हजार लोकवस्तीचे शहर आहे.  सद्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर आरोग्य प्रशासनाकडुन या घातक संसर्गातुन बचावण्यासाठी सुरक्षाकवच म्हणुन कोवीङशिल्ड हे लसीकरण दिले जात आहे.  मात्र यासाठी फैजपुर हे नगर परिषदचे शहर असल्यावरही या शहरातील नागरीकांना लसीकरणासाठी चार ते पाच किलोमिटर लांब असलेल्या न्हावी ग्रामीण रुग्णालयावरच अवलंबुन राहावे लागत आहे.  या ठिकाणी जाणाऱ्या नागरीकांना प्रसंगी उडवाउडवीचे उत्तर  देण्यात येत असल्याची माहीती त्यांनी देवुन फैजपुर शहरातच नगर परिषदेच्या माध्यमातुन लसीकरणासाठी पर्यायी व्यवस्था झाल्यास नागरीकांना व रूग्णांना होणारा त्रास टाळता येईलअशी मागणी  फैजपुर माजी नगराध्यक्ष निलेश ( पिंटु ) राणे यांनी बैठकीत केली.

Exit mobile version