Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूरात आता फळविक्रेत्यांना वेळेची मर्यादा; प्रांताधिकारी डॉ.थोरबोले यांचे आदेश

फैजपूर प्रतिनिधी । कोरोना संजर्गजन्य विषाणू रोखण्यासाठी लॉकडाऊन केले आहे. मात्र काही प्रमाणात नागरिक विनाकारण बाहेर फिरतांना दिसून येत असल्याने शहरातील सर्व फळ पालेभाजी विक्रेत्यांना आत सकाळी ७ ते १२ या वेळेत आपली दुकाने सुरू ठेवण्यात यावी, अन्यथा कायदेशिर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी सर्व फळ विक्रेत्यांना दिले आहे.

जळगाव येथील कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने काही भागात अत्यावश्यक सेवांना वेळेची मर्यादा खालून देण्यात आली आहे. नागरिक फळ व पालेभाजी घेण्याचे कारण सांगून विनाकारण बाहेर पडत आहे. नागरीकांनी कोरोना गांभीर्य घेत नसल्याने शहरातील सर्व पालेभाजे व फळविक्रेत्यांना सकाळी ७ ते १२ या वेळेतच आपली दुकाने सुरू ठेवावी. अन्यथा हातगाडी घेऊन गावात फिरावे एखाद्या फळ व पालेभाजी विक्रेत्यांची हातगाडी व दुकाने सुरू राहिल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी तंबी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी फळ व पालेभाजी विक्रेत्यांना दिली. यावेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण उपस्थित होते.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version