Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपुर येथे सात दिवशीय ‘स्वयं सिद्ध’ ज्युडो कराटे शिबिरास प्रारंभ

फैजपुर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील धनाजी नाना महाविद्यालयात ‘स्वयं सिद्ध’ अभियानांतर्गत विद्यार्थिनींसाठी सात दिवसीय ज्युडो, कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन कराटे प्रशिक्षक बापू हजबन यांच्या हस्ते करण्यात आले.

धनाजी नाना महाविद्यालय व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभाग आणि आणि युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वयं सिद्ध’ या सात दिवशीय अभियानाचे दि. २ मार्च रोजी उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थिनींना ज्यूडो,कराटेचे प्रशिक्षण चंद्रकांत सपकाळे व बापू हजबन हे देणार आहेत. बापू हजबन यांनी आपल्या मनोगतात युवतींना स्वतःला निरामय व कणखर बनवणे गरजेचे आहे, दुष्ट प्रवृत्तीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्यक मुलीने कराटे व ज्यूडोचे प्रशिक्षण घेतलेच पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. ए. आय. भंगाळे यांनी ‘युवती सभा’ युवतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी विकास विभाग आणि युवती सभेची कामगिरी अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. दोन्ही विभागातील प्राध्यापक आप आपली शैक्षणिक जबाबदारी पार पाडत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता विकसित करण्या बरोबरच मानसिक आणि शारीरिक विकासाच्या दृष्टीनेही निरनिराळ्या उपक्रमांचे आयोजन करत असतात त्यांच्या कार्याचा गौरव करत महाविद्यालयाच्या वतीने आणि महावीयलायाच्या व्यवस्थापनाच्या वतीने विद्यार्थ्यांना आवश्यक असेल त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विकासाठी त्याचा पुरे पूर उपयोग करून घ्यावा व सुजाण आणि सशक्त नागरिक म्हणून समाजात आपली ओळख निर्माण करावी हेच आमचे ध्येय असल्याचे सांगितले. प्रास्ताविक युवती सभा प्रमुख प्रा. डॉ. सविता वाघमारे यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य. डॉ. पी. आर. चौधरी,उप प्राचार्य डॉ. ए. आय. भंगाळे, उप प्राचार्य. प्रा. ए. जी. सरोदे, उप प्राचार्य डॉ. उदय जगताप,डॉ. डी. बी. तायडे विदयार्थी विकास अधिकारी डॉ. जी. जी. कोल्हे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी, डॉ. राजश्री नेमाडे, डॉ कल्पना पाटील, डॉ. जयश्री पाटील, डॉ. सरला तडवी, प्रा. विकास वाघूडदे, प्रा. पल्लवी भंगाळे, प्रा.शुभांगी पाटील, प्रा. डॉ.आरती भीडे, प्रा. वैशाली कोष्टी, प्रा. सुवर्णा चौधरी व शिक्षकेतर कर्मचारी गणेश चव्हाण, शेखर महाजन, धर्मेंद्र मोरे, सूरज चौधरी, यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सायली चौधरी हिने तर आभारज्ञानेश्वरी पाटीलने मानले,

 

Exit mobile version