Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपुरात दुर्गोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर  

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील जय शिवाजी दुर्गोत्सव मित्र मंडळ, व शिवमुद्रा ग्रुप फैजपुर यांच्या तर्फे दुर्गोत्सव निमित्त आज बुधवारी सकाळी 11 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यात 82 रक्त दात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला

प.पु.महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी रक्तदान शिबिराला सदिच्छा भेट देऊन रक्तदान शिबिर आयोजकांचे कौतुक केले. या रक्तदान शिबिरासाठी रक्त संकलन संजीवनी ब्लड सेंटर फैजपुर यांचे वतीने नितीन इंगळे, कांचन नेहेते यांनी सहकार्य केले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष कुणाल सरोदे, सुरज गाजरे, साजन चौधरी, दीपक कोलते, योगेश तडवी, विनोद कोल्हे vk, खिलू बोंडे डोलू चौधरी, सचिन पाटील, अनुप गाजरे, कल्पेश बाणाईत, विशाल पाटील, सोनू भंगाळे, दुर्गेश चौधरी, भूषण कोल्हे,चेतन धांडे, श्रीकांत चौधरी, राजू महाजन, डिगंबर झोपे, हेमंत चौधरी, तुषार चौधरी, प्रफुल कासार, सागर झोपे, राहुल वारके आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version