Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपुरातील चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयात संस्कृत शास्त्री संमेलनाचे आयोजन

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतातील एकमेव संस्कृत महाविद्यालय सेवाभावी असलेले फैजपूर येथील श्रीचक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय या नूतन इमारतीचे उद्घाटन समारंभ तथा संस्कृत शास्त्री संमेलन १८ ते १९ मार्च या दिवशी आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भारतभरातून पाचशे महानुभाव पंथाचे पाचशे संत उपस्थित राहणार आहे. अशी माहिती आचार्य मानेकर बाबा शास्त्री यांनी दिली.

 

सायंकाळी पाच वाजता श्रीचक्रधर गुरुकुल महाविद्यालय फैजपूर येथे करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाची फैजपूर येथे सन १९६१ साली झाली. हे महाविद्यालय ६२ वर्षांपासून अस्तित्वात असून दोनशे शास्त्री यांनी संस्कृत शास्त्री पदवी नागपूर विद्यापीठ अंतर्गत प्राप्त केली आहे. आता श्रीचक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय फैजपूर या नूतन इमारतीचे उद्घाटन समारंभ तथा संस्कृत शास्त्री संमेलन १८ व १९ मार्च २०२३ रोजी संपन्न होणार आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमाला भारतभरातून ५०० महानुभाव पंथाचे ५०० संत उपस्थित राहणार आहे.या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यात प्रामुख्याने आचार्य विंदवांस बाबा शास्त्री फलटण हे राहणार आहे.

 

तर आचार्य बाभुलगावकर बाबा शास्त्री करमाड, आचार्य खामणीकर बाबा कनाशी, आचार्य नागराजबाबा शास्त्री औरंगाबाद,आचार्य राहेरकर बाबा, आचार्य.संतोषमुनी शास्त्रि औरंगाबाद,आचार्य रिधपूरकर शास्त्री,श्री. आचार्य प्रवर न्यायबास बाबा,श्री.आचार्य प्रवर माहूरकर बाबा हे उपस्थित राहणार आहे.याप्रसंगी नूतन इमारत उद्घाटन सुशील के बाफना(जळगांव)यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.दरम्यान दि१८ मार्च रोजी सकाळी ६ ते ८ देवास मंगलस्नान,विडावसर अर्पण, गीता पारायण, सकाळी ९ ते १२ संस्कृत शास्त्री संमेलन सत्र १ ले व दुपारी ३ ते ५ संस्कृत शास्त्री संमेलन सत्र २ रे आणि संध्याकळी ६ ते ८ शोभा यात्रा व रात्री संस्कृत शास्त्री गणाचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार होणार आहे.दि.१९ मार्च रोजी सकाळी ६ ते ८ देवास मंगलस्नान,विडावसर अर्पण,गीता पारायण सकाळी ९ ते १२ या मध्ये प्रवेशद्वार उद्घाटन ध्वजारोहण नूतन इमारत उद्घाटन होणार आहे.यावेळी संमेलनात २५० ते ३०० शास्त्रीचा समावेश होणार आहे. अशी माहीती माहिती आचार्य मानेकर बाबा शास्त्री यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष वसंत विश्वनाथ महाजन, महाविद्यालयाचे प्राचार्य राजधर बाबा शास्त्री, उपप्राचार्य कृष्ण राज शास्त्री, राज शास्त्री, साहित्य चार्य राजधर बाबा शास्त्री, डॉ प्रा गोविंद शास्त्री जामोदेकर, हरिपाळ शास्त्री राहेरकर हे उपस्थित होते.

Exit mobile version