Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपुरातील आठवडे बाजार ३१ मार्चपर्यंत बंद

फैजपूर (प्रतिनिधी) फैजपूरातील आठवडे बाजार,तूप बाजार, शेळी बाजार ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार फैजपूर मुख्याधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत.

 

फैजपूरात उघड्यावर विक्री होत असलेले सर्व प्रकारचे मांसाहरी पदार्थांची विक्री पुढील आदेश येण्यापर्यंत बंद ठेवण्यात यावी. कोरोनामुळे फैजपूरातील आठवडे बाजार, तूप बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार फैजपूर ठिकाणी भरणारा शेळी बाजार 31 मार्च पर्यंत भरणार नाही, असे फैजपूर मुख्याधिकारी यांनी लेखी पत्र बाजार समितीला दिले आहे. फैजपूर उघड्यावर विक्री होत सर्व प्रकारचे असलेले मांसाहरी पदार्थ यासाठी नगरपालिकेचे बाजीराव नवले व सर्व सफाई कामगार यांनी उघड्यावर मांसाहरी पदार्थ पुढील आदेश येई पर्यंत विक्री करू नये. यासाठी मंगळवारी दुपारी 4 वाजता व्यावसायिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

 

परिसरातील महाविद्यालय व शाळा बंद

धनाजी नाना महाविद्यालय, म्युनिसिपल हायस्कूल, कुसुमताई मधुकरराव माध्यमिक विद्यलय, पी वाय चौधरी शाळा, जे टी महाजन इंग्रजी व सेमी इंग्लिश शाळा, शकुंतला माध्यमिक विद्यलय, शांती विद्या मंदिर, स्वामीनारायण स्कूल, मौलाना अब्दुल कलाम आझाद हायस्कूल, शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Exit mobile version