फैजपुरच्या ऑक्सीजन सेन्टरला यावल तालुका ग्रामसेवक युनियनची मदत

 

 

यावल :  प्रतिनिधी  । फैजपूर येथील कोरोना उपचार केंद्र लोकसहभागातून सक्षम बनवण्याच्या कामात आज  ५० हजारांची मदत करून यावल तालुका ग्रामसेवक युनियननेही आपला खारीचा वाटा  उचलला

 

जळगाव जिल्ह्यात सर्वत्र कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर तालुक्यातील बाधीत रुग्णांची उपचाराआभावी होत असलेली हेळसांड थांबविण्यासाठी फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी फैजपुर येथे लोक सहभागातुन जे टी . महाजन अभियांत्रीकी  महाविद्यालयात शंभर ड्युरा ऑक्सीजन  बेड  सेन्टर उभारणीचा संकल्प केला  आहे त्याला  रावेर आणि यावलच्या दानशुरांनी मदत करावी असे आवाहन केले आहे   या आवाहनाला  मोठा प्रतिसाद मिळत आहे .

 

आज यावल येथील राज्य ग्रामसेवक युनियनच्या यावल तालुका शाखेच्या माध्यमातुन लोकसहभागातुन ऑक्सीजन सेन्टर उभारणीसाठी  पन्नास हजार रुपयांची मदत करण्यात आली  ही  मदत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश  पाटील यांच्या हस्ते तहसीलदार महेश पवार यांच्याकडे सुपूर्द    करण्यात  आली  याप्रसंगी नायब तहसीलदार आर डी पाटील , सुयोग पाटील ,  ग्रामपंचायत विस्तार अधिकारी हबीब तडवी,  तालुकाध्यक्ष रुबाब तडवी , सचिव पुरूषोत्तम व्ही तळेले , हितेन्द्र महाजन , राजु तडवी ,  मजीत  तडवी  आदी मंडळी  उपस्थित होती .

 

Protected Content