Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फेसबुकवर महिलांचे फोटो अपलोड करुन अश्लिल मेजेस टाकून बदनामी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एका तरुणीचे फेसबुकवर इतर महिलांचे फोटो अपलोड करुन त्या फोटोवर अश्लिल मजकुर टाकून ते प्रसारीत करत बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवार, १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

भुसावळ शहरातील एका भागात तरुणी तसेच महिला वास्तव्यास आहेत. ५ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान अनोळखी व्यक्तीने तरुणीचे फेसबुकवर खाते तयार केले, तसेच या खात्यावर तरुणीचा प्रोफाईल फोटो ठेवला. तसेच या खात्यावर संबंधिताने आणखी दोन महिलांचे फोटो अपलोड केले, त्या फोटोवर अश्लिल मजकुर टाकून तो प्रसारीत केला. १४ फेब्रुवारी रोजी हा प्रकार लक्षात आल्यानंतर याप्रकरणी तरुणीने हा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानुसार तरुणीच्या मामाने बुधवारी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अनोळखी फेसबुक खाते असलेल्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

Exit mobile version