Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फूटपाथवर झोपलेल्या मजुरांना डंपरने चिरडलं, १५ ठार !

 

सुरत : वृत्तसंस्था । गुजरातच्या सुरतमध्ये एका डंपरने लहान मुलांसह २२ जणांना चिरडले. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी आहेत. जखमींना सध्या सुरतच्या स्मीमेर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व मजूर रात्री फूटपाथवर झोपलेले होते.

झोपेतच या मजुरांवर काळ आला आणि १५ जणांसाठी कालची रात्र अखेरची ठरली

ही दुर्घटना सुरतच्या पालोद गावात घडली. ऊसाचा ट्रॅक्टर आणि डंपर आमोरासमोर आले. यावेळी डंपरचालकाचं नियंत्रण सुटलं आणि तो डंपर फूटपाथवर झोपलेल्या मजुरांवर गेला. हे सर्व मजूर राजस्थानचे राहणारे असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

या दुर्घटनेत सहा महिन्यांचं एक स्त्री जातीचं बाळ वाचलं आहे. पण, तिच्या आई-वडिलांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्व मजूर हे राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड येथील राहणारे असल्याची माहिती आहे. सध्या मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत

सोमवारी गुजरातच्या सुरत येथील किम रोडच्या कडेला फूटपाथवर २२ मजूर झोपलेले होते. यावेळी रस्त्यावर एक डंपर आणि एक ट्रॅक्टर आमोरासमोर आले. त्यामुळे चालकाचा डंपरवरील टाबा सुटला आणि डंपर फूटपाथवर चढला. येथे झोपलेल्या २२ मजुरांना या डंपरने चिरडले. या घटनेत डंपरचा चक्काचूर झाला. यावरुन हा अपघात किती भीषण होता, याचा अंदाज लावता येतो. सध्या सुरत पोलीस या घटनेचा तपास करत आहेत

Exit mobile version