फुले मार्केट परिसरातील दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

जळगाव, प्रतिनिधी । फुले मार्केट परिसरात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. यातच कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ग्राहकांसोबतच दुकानदारांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करत प्लास्टिक सीट न लावणाऱ्या दुकानदारांवर  उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने कारवाई केली.

 

कोरोनाचा संसर्गवाढू नये यासाठी व्यवसायासाठी दुपारी २ वाजेपर्यंत मुभा देण्यात आलेली आहे. यातच काही दुकानदार कोरोना प्रतिबंध नियम पाळत नसल्याचे आज पहावयास मिळाले. या दुकानदारांना प्लास्टिकचा पडदा दुकानाच्या प्रवेशद्वारावर टाकण्याची सूचना उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिल्यात. यासोबत दुकानात ग्राहकांची गर्दी होणार नाही याची काळजी दुकानदारांनी घ्यावी असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी जवळपास १०० ते १५० दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.

Protected Content