Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फुटबाॅल लीग स्पर्धेत जैन स्पोर्टस अॅकडमी विजयी

जळगाव, प्रतिनिधी | जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल लीग स्पर्धेत जैन स्पोर्टस अकॅडमीने विजयी मिळविला आहे.

 

शिरसोली रोडला असलेल्या अनुभूती इंटरनॅशनल स्कूल येथे फुटबॉल लीग स्पर्धेचा अंतिम सामना जैन स्पोर्टस् अकॅडमी विरूद्ध रेल्वे फुटबॉल अकॅडमी यांच्यात रंगला. यामध्ये जैन स्पोर्टस अकॅडमीने ४-० ने विजय प्राप्त केला. रेल्वे फुटबॉल आणि जैन स्पोर्टस यांच्यातील सामना पहिला हाफ मध्ये ०-० बराबरी होता. पण दुसऱ्या हाफ मध्ये दुसऱ्याच मिनिटात आकाश कांबळेने आपल्या संघाला एक गोल करून बढती दिली. तसेच दुसरा हाफ मध्ये १४ मिनिटांमध्ये रेल्वे फुटबॉल अकॅडमी डिफेंडर ने डी मध्ये कॉल करून दिला. पंचांनी त्या फाऊलला पेंन्लटी दिल्याने त्या पेनल्टी ला आकाश कांबळे ने गोलमध्ये कन्व्हर्ट केले. असे दोन गोल करून जैन स्पोर्ट्स अकॅडमीला यशस्वी बढत मिळून दिली. तसेच २७ मिनिटांमध्ये कौशल पवारने गोल करून आपल्या संघाला बढत दिली. तसेच दुसऱ्या हाफ मध्ये शेवटच्या चार मिनिटात जयेश महाजन ने आपल्या संघाला विजयासाठी चौथा गोल केला असे ४-० ने जैन स्पोर्टस् अकॅडमी विजय ठरला. या स्पर्धेत उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून संजय कासदेकर जै.स.ए बेस्ट डिफेंडर म्हणून सूरज सपके, जै.स.ए बेस्ट स्कोरर आकाश कांबळे, जै.स.ए व बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेँट रेहान तडवी रेल्वे फुटबॉल अकॅडमी यांना जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अभेद्य जैन, अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, फुटबॉल मुख्य प्रशिक्षक अब्दुल मोहसिन यांच्याहस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत बेस्ट डिसिप्लिन ॲवार्ड मू.जे. महाविद्यालय यांना देण्यात आला. बेस्ट इमर्जिंग प्लेयर लकी जूनियर बॉईज भुसावळचा सादिक सय्यद यांना देण्यात आला.

Exit mobile version