Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फितूर पत्रकाराची हरामखोरी ; गुप्त लष्करी माहितीचा चीनला पुरवठा

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । दिल्लीत १४ सप्टेंबरला अटक करण्यात आलेला पत्रकार राजीव शर्मा याच्यासंदर्भात पोलिसांनी अनेक खुलासे केले आहेत. पत्रकार राजीव हा भारताच्या सीमेवरील रणनीची माहिती चीनच्या गुप्तचरांना देत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पत्रकार राजीव शर्मा याला पोलिसांनी ऑफिशल सीक्रेट अॅक्ट अंतर्गत अटक केली आहे.

पत्रकार राजीव शर्मा २०१६ ते २०१८ पर्यंत चिनी गुप्तचर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता. अनेक देशांमध्ये शर्माने चिनी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. राजीव शर्मा चिनी गुप्तचर यंत्रणेला सीमेवरील भारतीय लष्कराची तैनाती आणि भारताच्या सीमा रणनीतीबद्दलही माहिती चिनी गुप्तचर यंत्रणेला देत होता, असं दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे डीसीपी संजीव कुमार यादव यांनी सांगितलं.

चिन्यांना गोपनीय माहिती देण्यासाठी अटक करण्यात आलेल्या राजीव शर्माला गेल्या एका वर्षात ४०-४५ लाख रुपये मिळाले. शर्माने प्रत्येक माहितीसाठी १००० डॉलर्स घेतले. राजीव शर्माला पत्रकारितेचा जवळजवळ ४० वर्षांचा अनुभव आहे. तो चिनी सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ मध्ये तसेच भारतातील बर्‍याच माध्यम संस्थांसाठी संरक्षण विषयावर लिहित असतो , असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. राजीव २०१६ मध्ये चिनी एजंटच्या संपर्कात आला होता. फ्रिलान्स पत्रकार राजीव शर्माला १४ सप्टेंबरला केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या माहितीच्या आधारावर अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून संरक्षण मंत्रालयाची गोपनीय कागदपत्रंही मिळाली होती.

चिनी महिला आणि तिच्या नेपाळी साथीदाराला अटक करण्यात आली आहे. ‘चिनी गुप्तचर एजन्सी’ला संवेदनशील माहिती पुरवण्याच्या बदल्यात ते पत्रकार राजीव शर्माला मोठी रक्कम देत होते. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात मोबाइल फोन, लॅपटॉप आणि इतर आक्षेपार्ह आणि संवेदनशील साहित्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

Exit mobile version