Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फसवणूकीच्या गुन्ह्यात ११ वर्षांपासून फरार संशयिताला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नोकरीचे आमिष दाखवत जळगावातील एकाची सहा लाख रूपयांची फसवणूक करून ११ वर्षांपासून फरार आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. संशयितावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात राहणारे कमलाकर एकनाथ बडगुजर (वय-६०) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २९ जानेवारी २०११ मध्ये कमलाकर बडगुजर यांची गोपीकिशन ओमप्रकाश जांगीड (वय-४२) रा. रामपुरा ता. राजगड जि. चुरू राजस्थान याच्याशी ओळख झाली. त्यानंतर एका ठिकाणी डिप्यूटी डायरेक्टर पद देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार कमलाकर बडगुजर यांनी वेळोवेळी एकुण ६ लाख रूपये दिले. दरम्यान, कंपनीचे कुठलेही पद दिले नाही. त्यानंतर कंपनी बंद करुन फरार होवून फसवणूक केली. याबबात एमआयडीसी पोलीस ठाण्यात ७ सप्टेंबर २०११ रोजी एमआयडीसी पोंलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फसवणूकीच्या गुन्ह्यात ११ वर्षांपासून फरार असलेला संशयित आरोपी गोपीकिशन ओमप्रकाश जांगीड हा जळगाव शहरात आला असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, पोहेकॉ अल्ताफ पठाण, सचिन मुंडे यांनी संशयिताला महाबळ परिसरातून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, पोलीस कर्मचारी संदीप धनगर करीत आहे.

Exit mobile version