Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फवारणीसाठी महापौर स्वत: उतरल्या रस्त्यावर !

जळगाव प्रतिनिधी । मेहरूणमध्ये कोरोनाचा रूग्ण पॉझिटीव्ह आढळल्यानंतर महापालिकेने या भागासह शहरात फवारणी सुरू केली असून स्वत: महापौर भारतीताई सोनवणे या रस्त्यावर उतरून कर्मचार्‍यांकडून काम करून घेत आहेत.

शहरात शनिवारी रात्री कोरोनाचा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली. यानंतर महापौर भारती सोनवणे यांनी रविवारी तात्काळ मनपाचे पथक पाठवून मेहरूण परिसर निर्जंतुक करण्यासाठी फवारणी मोहीम राबविली. ही मोहीम आजदेखील सुरू राहिली. महापौर भारतीताई सोनवणे यांनी मनपा प्रशासन आणि काही सामाजिक संस्था, समाजसेवक यांच्या माध्यमातून शहरात निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम राबवली. मनपाच्या मलेरिया विभागात ब्लिचिंग पावडरच्या साहाय्याने मोठ्याप्रमाणात केमिकल तयार करण्यात येत आहे. महापौर भारतीताई सोनवणे व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी स्वतः त्याठिकाणी जाऊन पाहणी केली.

दरम्यान, या मोहिमेत नगरसेविका प्रतिभा सुधीर पाटील, चंद्रशेखर पाटील, लताताई भोईटे, मनोज चौधरी, प्रतिभा गजानन देशमुख, प्रतिभा कापसे, विजय पाटील, सदाशिवराव ढेकळे, रेखा पाटील, सुरेखा सोनवणे, राजेंद्र पाटील, सुनील महाजन, जयश्री महाजन, शबानाबी शेख, प्रशांत नाईक, चेतना चौधरी, किशोर चौधरी, चेतन सनकत यांनी आपापल्या प्रभागांमध्येही फवारणी मोहीम राबवली. स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा, अतुलसिंग हाडा, रेश्मा काळे, अमित काळे, कुंदन काळे, शोभाताई बारी, अतुल बारी, कुलभूषण पाटील, सुरेश सोनवणे, झाकीर पठाण, मनोज काळे, मयूर कापसे, धीरज सोनवणे यांनी स्वखर्चाने आपल्या प्रभागात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केली.

जळगाव शहरात फवारणीसाठी जैन इरिगेशनचे अशोकभाऊ जैन यांनी मोठा बंब तर सातपुडा ऑटोमोबाईल्सचे संचालक किरण बच्छाव आणि पिलखेडा येथील उमानंद चौधरी यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिलेले असल्याने महापौर भारतीताई सोनवणे यांनी त्यांचे आभार मानले आहे. दरम्यान, फवारणीची ही मोहिम येत्या काही दिवसांपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

Exit mobile version