Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फळपीक विमा कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांचा आंदोलन

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील प्रधानमंत्री फळ पिक विमाधारक शेतकऱ्यांनी नियम,अटी व कागदांची पूर्तता करूनही पुन्हा नव्याने कागदपत्रांची मागणी करत असल्याने शेतकरी आक्रमक पवित्रा घेत कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन केला.

 

तालुक्यातील प्रधानमंत्री फळ पिक विमाधारक शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विम्याच्या निकषानिहाय अटींची प्रक्रीया पुर्ण केली. तरीही अचानक मध्येच पुन्हा नव्याने पिक विमा कंपनीमार्फत नव्याने जिओ टॅकींगचे फोटो , भाडे तत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी आदीच मुळ मालकाचे संमतीपत्र लिहुन दिल्यावर सुद्धा त्याच कागदपत्रांची नव्याने मागणी करण्यात येवु लागली आहे. दरम्यान नवनवीन कारणे दाखवुन पडताळणी व चौकशीच्या नांवाखाली शेतकऱ्यांना त्रास दिले जात आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केला. आणि तहसीलदार आर.डी. पाटील यांना तक्रार निवेदन दिले. तसेच सदर प्रश्न मार्गी लावण्यात आले नाही तर शेतकऱ्यांच्या वतीने तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिले आहे.

यावेळी आंदोलनात पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, कॉंग्रेसचे कदीर खान , अनिल जंजाळे , काँग्रेसचे हाजी गफ्फार शाह, नईम शेख , साकळीचे शेतकरी दिपक पाटील , यावलचे नगरसेवक शेख असलम शेख नबी, समिर शेख मोमीन , शेतकरी कोमल पाटील, धिरज कूरकुरे, अमोल पाटील , अमर कोळी ,हेमंत पाटील , लोकेश महाजन , वसंत पाटील , तुषार जावळे , वैभव महाजन यांच्यासह शेकडो शेतकरी बांधवांनी या आंदोलनात सहभाग घेतला .

Exit mobile version