Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फर्निचर व्यवसायिकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरातील मराठी शाळेजवळून फर्निचर व्यावसायिकाची दुचाकी लांबविल्याप्रकरणी रामानंदनगर पोलस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील हरिविठ्ठलनगरात  मराठी शाळेजवळ फर्निचर व्यावसायिक युवराज सुकलाल हिरे वय ५८ हे वास्तव्यास आहेत. युवराज हिरे यांनी २० मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांची एम.एच. १९ ए.वाय.०५७१ या क्रमाकांची दुचाकी घराजवळ असलेल्या शाळेसमोर रस्त्यालगत उभी केली होती. दुसऱ्या दिवशी दुचाकी मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेवून दुचाकी मिळून न आल्याने चार दिवसानंतर शुक्रवारी युवराज हिरे यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे हे करीत आहेत.

Exit mobile version