Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फरकांडे वि.का.सो. चेअरमनपदी राजेंद्र ठाकरे बिनविरोध

WhatsApp Image 2020 02 20 at 9.21.48 AM

कासोदा, प्रतिनिधी :  एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी राजेंद्र लोटनराव ठाकरे यांची तर मंगलाबाई नामदेव पाटील यांची व्हॉइस चेअरमन पदी निवड करण्यात आली.

फरकांडे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र ठाकरे व व्हॉइस चेअरमनपदी मंगलाबाई पाटील यांची सोसायटीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित संचालक शांताराम चौधरी, संतोष पाटील, रामराव पाटील, समाधान पाटील, धुडकु पाटील, सुनील चव्हाण, संदीप शिंपी, जिजाबराव गढरी, रायभान पाटील, दिलीप बेहेरे, लक्ष्मीबाई कुंभार हे सर्व संचालक उपस्थित होते. शांताराम चौधरी यांनी राजेंद्र ठाकरे यांचे नाव चेअरमन पदासाठी सुचवले तर संतोष आनंदा पाटील यांनी अनुमोदन दिले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चेअरमन व व व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड जाहीर केली. त्यांच्या निवडीबद्दल दिलासा व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष साहेबराव पाटील, माजी चेअरमन राजेंद्र पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, माजी चेअरमन वसंत पाटील, माजी सरपंच रोहिदास पाटील, रोजगार हमी योजनेचे अध्यक्ष शांताराम चव्हाण, श्रीनाथ पाटील, मुकुंदा पाटील, सुनील दयाराम पाटील, शालिक पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version