Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फरकांडे येथे लॉकडाऊनमध्ये आदर्श विवाह

 

कासोदा, प्रतिनिधी। एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून चौधरी कुटुंबांचा विवाह सोहळा अत्यंत सध्या पद्धतीने पार पडला.

फरकांडे येथील मधुकर भिकन चौधरी यांचे चिरंजीव किशोर व अमळनेर येथील सुभाष रामचंद्र चौधरी यांची सुकन्या मनीषा यांचा शुभविवाह दिनांक १९ मे रोजी मोजक्याच आप्तेष्टांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सर्वत्र कोरोना आजारामुळे शासनाने लादलेल्या सर्व नियम अटी व शर्तींचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेवून हा विवाह आनंदाने पार पडला. चिरंजीव किशोर हे फरकांडे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या परिस्थितीत मोजक्या आप्तेष्टमध्ये हा विवाह पार पडून एक आदर्श निर्माण केला आहे.

Exit mobile version