Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फडणवीस व राऊत यांची भेट

 

मुंबई, वृत्तसंस्था । विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत भेट घेल्याने राज्यात पुन्हा राजकीय भूंकप येणार असल्याच्या चर्चला उधाण आले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या स्थौऱ्याबाबत विरोधकांकडून वारंवार शंका उपस्थित करण्यात येत आहे. यातच मुंबईतील ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये संजय राऊत आणि फडणवीस यांनी भेट घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीसाठी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. दोन्ही पक्षातील कुणालाही या बैठकीची कल्पना देण्यात आली नव्हती. त्यांच्यात तब्बल अडीच ते तीन तास चर्चा झाली आहे. या चर्चेचा तपशील मिळू शकला नसला तरी राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही भेट असेल. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version