Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फडणवीस कोरोनामुक्त

मुंबई : वृत्तसंस्था । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

२४ ऑक्टोबर रोजी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर ते सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाले होते. आज रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी ट्विट करुन सांगितलं होतं. रुग्णालयाच्या बाहेर येताच देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडून सगळ्यांना अभिवादनही केलं. त्यांच्यासोबत माजी मंत्री गिरीश महाजनही होते.

सेंट जॉर्ज रुग्णालयाचे सुप्रीटेंडंट डॉ. आकाश खोब्रागडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुढचे १० दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर होम क्वारंटाइन असणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्याने त्यांची थोडी अधिक काळजी घ्यावी लागत होती. देवेंद्र फडवीस यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही ९३ पर्यंत खाली आली होती. त्यामुळे मागील आठवड्यात त्यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९७ पर्यंत वाढली. गेल्या रविवारी आणि सोमवारी देवेंद्र फडणवीस यांना प्लाझ्मा थेरपीचे डोसही देण्यात आले होते असंही डॉ. खोब्रागडे यांनी सांगितलं.

Exit mobile version