Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प. वि. पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयात व्याख्यान

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प. वि.पाटील तसेच ए टी झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘ थोरलं राजं सांगून गेलं ‘ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

सर्वप्रथम विद्यालयाची विद्यार्थिनी पियुशा नेवे  हिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर इतिहास संकलन समिती महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव रवींद्र पाटील यांनी सदर व्याख्यानाद्वारे विद्यार्थ्यांना बाल शिवाजी महाराजांची आठवण करून दिली. ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे आपल्या स्वराज्य साठी लढले त्याचप्रमाणे आपण सुद्धा शिवाजी महाराजांच्या विचारांचे आचरण करून देश सेवेसाठी सदैव तत्पर असावे , शिवराय त्यांचा गनिमी कावा , शिवकालीन अर्थ व्यवस्था, शिवनेरी आणि रायगडाचे प्रसंग, अशा विविध घटनांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर व्याख्यानाचे ऑनलाइन लाईव्ह प्रक्षेपण सर्व विद्यार्थ्यांना यूट्यूब च्या माध्यमातून दाखवण्यात आले. प्रसंगी शाळेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी , मुख्याध्यापिका रेखा पाटील , डी व्ही चौधरी , सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version