प्लॉट घेण्यासाठी विवाहितेला पाच लाखांची मागणी करत मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आसोदा येथील विवाहितेला प्लॉट घेण्यासाठी पाच लाखाची मागणी करत शिवीगाळ व मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आसोदा येथील माहेर असलेल्या गौरी उर्फ मोहिनी विशाल भोलाणकर (वय-२२) यांचा विवाह पुणे जिल्ह्यातील बारामती येथील विशान मोहन भोलाणकर यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला आहे. लग्नाचे सुरूवातीचे एक महिना चांगला गेला त्यानंतर पती विशाल मोराणकर याने बारामतीत प्लॉट घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणण्याची मागणी केली. परंतू विवाहितेच्या आईवडीलांची परिस्थीती हालाखीची असल्याने पैश्यांची पुर्तता केली नाही. याचा राग मनात ठेवून पती विशाल याने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सासू, सासरे, दीर, ननंद यांनी देखील पैशांचा तगादा लावला. त्यानंती पती विशाल याने विवाहितेला जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. अखेर शुक्रवार २६ मे रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती विशाल मोहन मोराणकर, सासरे मोहन निवृत्ती मोराणकर, सासू सविता मोहन मोराणकर आणि दीर दिपक मोहन मोराणकर सर्व रा. बारामती जि.पुणे यांच्याविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे करीत आहे.

Protected Content