Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्लास्टिक बंदी निर्णयानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखावा; हिंदू जनजागृती समितीची मागणी

यावल प्रतिनिधी । प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयानुसार कार्यवाही करणेबाबत हिंदू जनजागृती समितीतर्फे यावल तहसीलदार व पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता १५ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी अनेक जण राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात, मात्र हेच कागदी प्लास्टिकचे छोटे-छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर कचऱ्यात, गटारीत इत्यादी ठिकाणी पडलेले आढळतात,प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्ट होत नाहीत त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते राष्ट्रध्वजाची अशाप्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, महाराष्ट्र शासनाने राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणे हे कायदाबाह्य ठरते. तिरंगा मास्क हे देश प्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही तर ध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अशा प्रकारे उपयोग करणे हा ध्वजाचा अवमानच आहे, तसेच राष्ट्र गौरव अपमान निवारण अधिनियमाचे उल्लंघन आहे,त्यामुळे तिरंगा मास्कची विक्री तसेच वापर करणाऱ्यांना शासन करावे अशी सुद्धा मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

हिंदू जनजागृती समितीतर्फे मागण्या खालील प्रमाणे आहेत
१)शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रबोधन करणारी कृती समिती स्थापन करावी त्यामध्ये हिंदू जनजागृती समितीचा ही समावेश करावा अशी विनंती आहे, समिती या राष्ट्र सेवेस तत्पर आहे. यापूर्वी(भिवंडी आणि जळगाव या ठिकाणी अशी कृती समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये समितीच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेतले आहे.
२) जिल्ह्यात कुठेही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन आणि त्याची विक्री होते का? याची खात्री करावी असे होत असल्यास संबंधित उत्पादकावर त्वरित कार्यवाही करावी.
३) जेथे शक्य आहे तेथे समितीला शाळातून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा या विषयावर व्याख्यान आणि प्रश्नमंजुषा घेण्यास अनुमती द्यावी. ४)नागरिकांचे प्रबोधन व्हावे यासाठी समितीने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा ही विशेष चित्रफित बनविली आहे ही चित्रफीत केबल वाहिन्यांना दाखवण्यास अनुमती द्यावी ही विनंती.

अशा मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीतर्फे निवेदन देतांना सदस्य धिरज भोळे , प्रशांत जुवेकर , चेतन भोईटे , लखननाथ, कोळी , हेमंत बडगुजर , चंदु बडगुजर , शिवाजी बारी यांची उपस्थिती होती.

Exit mobile version