Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्मह्त्या

 

 

 यावल :  प्रतिनिधी  ।  तालुक्यातील परसाडे गावात एका प्रेमी युगुलाने  गळफास घेवुन आत्महत्या केल्याची आज घटना घडली

 

या घटनेमुळे  परसाडे  गावावर शोककळा पसरली आहे .परसाडे गावात एकाच समाजातील प्रेमींनी गावशिवाराला लागुन वड्री परसाडे गावाला जाणाऱ्या रस्त्याशेजारच्या पुष्पा गडे यांच्या शेतातील निंबाच्या झाडास एकाच वेळी  गळफास   घेतला

 

.विशेष म्हणजे आज यातील तरुणाचा चिनावल येथे साखरपुडा होणार असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले  मात्र परसाडे येथील मिना शावखाँ तडवी ( वय २२ , रा – परसाडे ) या तरुणीचा तो प्रियकर होता    हरीपुरा येथील शाहरूख बाबु तडवी ( वय १९ ) असे त्याचे नाव होते .  या दोघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस  आल्यानंतर  वड्रीचे पोलीस पाटील ईब्राहीम तडवी यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात गुन्हा दाखल कसण्यात आला   पोलीसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह घटनास्थळावरून शवविच्छेदनासाठी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात  पाठवले

 

 

Exit mobile version