Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रिया बेर्डेंसह अन्य कलावंत लवकरच राष्ट्रवादीत !

पुणे । अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अन्य कलावंत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतीक विभागाचे प्रमुख बाबा पाटील यांनी दिली आहे.

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासह सुहासिनी देशपांडे, अभिनेता सिध्देश्‍वर झाडबुके, विनोद खेडकर, निर्माता संतोष साखरे व सुधीर निकम तसेच ख्यातनाम लावणीसम्राज्ञी शकुंतलाबाई नगरकर हे मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती बाबा पाटील यांनी दिली. पुणे येथील कार्यक्रमात ७ जुलै रोजी हे सर्व मान्यवर राष्ट्रवादीत प्रवेश करतील. यातील प्रिया बेर्डे यांचा पक्षप्रवेश लक्षणीय मानला जात आहे. पूर्वाश्रमीच्या प्रिया अरूण यांनी सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अर्धागिनी आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमधून काम केले असून अलीकडे त्या काही दूरचित्रवाणी कार्यक्रमांमध्येही भूमिका साकारत आहेत. त्यांनी आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Exit mobile version