Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रा. डॉ. वैष्णवी महाजन यांचा प्राध्यापक प्रबोधिनीतर्फे सत्कार

पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | प्रा. डॉ. वैष्णवी महाजन यांनी पीएचडी पदवी संपादन केली असून प्राध्यापक प्रबोधिनीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

पाचोरा तालुका सह. शिक्षण संस्था संचलित श्री. शेठ मु. मा. महाविद्यालय पाचोरा येथील प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने आपल्या महाविद्यालयातील सिनीयर कॉलेज गाणित विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. वैष्णवी महाजन यांनी जे.. जे.. टी. यु. मधून नुकतीच पी. एच. डी. प्राप्त केल्या केल्याबद्दल त्यांचा प्राचार्य डॉ. वासुदेव वले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, प्रा. पी. आर. सोनवणे, प्रा. एस. आर. ठाकरे, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. पी. एम. डोंगरे, डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा.वाय. बी. पुरी यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याकार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. के. एस. इंगळे यांनी तर आभार प्रा.डॉ. एस.बी.तडवी यांनी मानले.

Exit mobile version