Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रा. राजेंद्र तायडे यांना पीएच.डी पदवी प्रदान

फैजपूर ,प्रतिनिधी । येथील प्रा. डॉ. राजेंद्र तायडे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मानवविद्या शाखाअंतर्गत हिंदी विषयात पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली.

भुसावळ कला,विज्ञान आणि पु.ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयतील हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रेखा गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गीतांजलि श्री का कथा-साहित्यःविषय वस्‍तु एवं शिल्प या विषयात त्यांनी संशोधन केले आहे . हरिद्वार -उत्तराखंड येथील गुरुकुल कांगडी विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संत राम वैश्य बाह्य परीक्षक म्हणून होते तर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मानव्यविद्या शाखेतील भाषा अध्ययन प्रशाळा आणि अनुसंधान केंद्र व हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी समितीचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष व आमदार शिरीष चौधरी तसेच भुसावळ येथील ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहनभाऊ फालक, चेअरमन महेशभाऊ फालक, प्राचार्य डॉ.सौ.मीनाक्षी वायकोळे, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, प्राचार्य व्ही. आर. पाटील, महाराष्ट्र हिंदी परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. मधु खराटे, प्राचार्य डॉ. नाना गायकवाड, प्रा. डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा.डॉ. मनोहर सुरवाडे आदींनी प्रा. डॉ. राजेंद्र तायडे यांचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version