प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटननेतर्फे पदाधिकाऱ्यांंना नियुक्तीपत्र प्रदान (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन नवी दिल्ली यांचा एक दिवशीय मानोधिकार या विषयावर प्रशिक्षण आणि ओळखपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन नवी दिल्ली. संघटनेतर्फे पत्रकार भवनात संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते यांच्या प्रमुख उपस्थित एक दिवशीय मानवाधिकार या विषयावर प्रशिक्षण आणि ओळखपत्र वाटप कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने, अॅड. राहुल वाघ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा पूनम खैरनार, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनंत टोपले, महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षा शोभा आखाडे (मोरे), उतर महाराष्ट्र महिला अध्यक्षा भारती कुमावत व हेमराज किरंगे उपस्थित होते. यावेळी अॅड. राहुल वाघ यांनी मानवाधिकार यावर विशेष मार्गदर्शन केले.

दरम्यान, आज जळगाव जिल्हा नवनियुक्त पदाधिकारी कार्यकारणीच्या सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यात जळगाव जिल्हा अधीक्षकपदी प्रवीण राजाराम पाटील, पाचोरा तालुका महिला शाखेच्या अध्यक्षपदी मंदाकिनी नीलकंठ पाटील, पाचोरा तालुका जनसंपर्कपदी इसा मुसा तडवी, रावेर तालुका आयोजकपदी रमेश हरी बोरनारे, जळगाव जिल्हा उपसचिवपदी चंद्रकांत रोहिदास बधे यांच्यासह जिल्ह्यातील विविध एकूण ४१ पदाधिकाऱ्यांंना नियुक्ती पत्र देण्यात आले.

 

 

 

Protected Content